पाचगणी (टीम कृष्णकुंजन्यूज नेटवर्क)
भिलार, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणी परिसरात १५ ऑगस्टची सुट्टी आणि शनिवार-रविवारची सलग सुट्टी आल्याने पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पाचगणी, महाबळेश्वर परिसरातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.
सध्या श्रावण महिना सुरू असून, परिसरात ऊन-पावसाची सुरू असलेली लपंडावाची खेळी पर्यटकांच्या आनंदात आणखी भर घालत आहे. पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या असून, दऱ्यांमध्ये पसरलेले धुके, वाहणारे धबधबे आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे. पावसाळ्यात पाचगणी आणि महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य विशेष खुलून येते.महाबळेश्वर-पाचगणीमधील विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी दिसून येत असून, पर्यटक निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेताना तसेच छायाचित्रे काढताना दिसत आहेत. लिंगमळा धबधबा परिसरातही पर्यटकांची वर्दळ वाढली असून, भिलार परिसरातील धबधब्यांवरही पर्यटक पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेत आहेtविशेषतः तरुणाई आणि कुटुंबांसह आलेले पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत असून, विविध सेल्फी पॉईंटवर छायाचित्रे काढण्याची लगबग सुरू आहे. पाचगणीतील टेबल लँड, पारसी पॉईंट, सिग्नेपॉइंट यांसह विविध पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
सलग सुट्ट्यांमुळे या भागात पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता असून, मागील सुट्ट्यांच्या काळातही महाबळेश्वर-पाचगणी परिसरात मोठी पर्यटक गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे.
पावसाळ्यातील हिरवाई, धबधबे आणि धुक्याची चादर यामुळे महाबळेश्वर-पाचगणी सध्या पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण ठरत आहे.
महाबळेश्वर-पाचगणीमध्ये विकेंडला पर्यटकांची गर्दी; धबधबे, निसर्गसौंदर्याचा पर्यटकांकडून मनमुराद आनंद
भिलार, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणी परिसरात १५ ऑगस्टची सुट्टी आणि शनिवार-रविवारची सलग सुट्टी आल्याने पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पाचगणी, महाबळेश्वर परिसरातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.
सध्या श्रावण महिना सुरू असून, परिसरात ऊन-पावसाची सुरू असलेली लपंडावाची खेळी पर्यटकांच्या आनंदात आणखी भर घालत आहे. पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या असून, दऱ्यांमध्ये पसरलेले धुके, वाहणारे धबधबे आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे. पावसाळ्यात पाचगणी आणि महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य विशेष खुलून येते.
महाबळेश्वर-पाचगणीमधील विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी दिसून येत असून, पर्यटक निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेताना तसेच छायाचित्रे काढताना दिसत आहेत. लिंगमळा धबधबा परिसरातही पर्यटकांची वर्दळ वाढली असून, भिलार परिसरातील धबधब्यांवरही पर्यटक पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेत आहेत.
विशेषतः तरुणाई आणि कुटुंबांसह आलेले पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत असून, विविध सेल्फी पॉईंटवर छायाचित्रे काढण्याची लगबग सुरू आहे. पाचगणीतील टेबल लँड, पारसी पॉईंट, सिग्नेपॉइंट यांसह विविध पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे.