Oplus_16908288
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन

,(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
खंडाळा :
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक ( दि. 2 ) शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरभी मंगल कार्यालय, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनी दिली
पश्चिम महाराष्ट्रात पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा, आगामी काळातील पक्षाच्या विविध उपक्रमांचे नियोजन तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे,महाराष्ट्र महासचिव प्रा. सोमनाथ साळुंखे हे उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील नूतन प्रदेश पदाधिकारी यांचीही या बैठकीस उपस्थिती राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस वेळेत व मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनात्मक चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.
सातारा जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे व सातारा जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्ष दयानंद माने यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
