भिलार प्रतिनिधी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क) आगामी ईद-ए-मिलाद, दहीहंडी तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचगणी शहरात रविवारी (दि. २३ ऑगस्ट) सायंकाळी पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला. सण-उत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हा रूटमार्च घेण्यात आला.
सायंकाळी ५ ते ५.४५ वाजण्याच्या दरम्यान पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत हा रूटमार्च पार पडला. रूटमार्चची सुरुवात जुने पोलीस स्टेशन येथून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामा मशीद, टेबल लँड कॉर्नर, राहिल प्लाझा, एस.टी. स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुन्हा जुने पोलीस स्टेशन येथे रूटमार्चची सांगता करण्यात आली.
या रूटमार्चमध्ये १ पोलीस अधिकारी, १८ पोलीस अंमलदार, १७ होमगार्ड तसेच ८ एमएसएफ जवान सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून शहरात सतर्कता वाढविण्यात आली आहे.
