एसटी स्टँड परिसरात पोलिसांचा सराव; शहरातील प्रमुख मार्गांवरून रूट मार्च

पाचगणी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी जातीय दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. यानंतर पाचगणी शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.
सायंकाळी ५.३० ते ६.२५ या वेळेत पाचगणी एसटी स्टँड परिसरात हा सराव पार पडला. यावेळी उपस्थित अधिकारी व पोलीस अंमलदारांना दंगल नियंत्रणासंदर्भातील माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यपद्धतींचा सराव करण्यात आला.
रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर पाचगणी शहरात रूट मार्च काढण्यात आला. जुन्या पोलीस स्टेशनपासून सुरू झालेला हा रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँड, बाजारपेठ आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुन्या पोलीस स्टेशन येथे पोहोचला.
या रूट मार्चमध्ये पाचगणी पोलीस ठाण्याचे एक पोलीस अधिकारी, ११ पोलीस अंमलदार, १२ होमगार्ड आणि सर्व आवश्यक साहित्याने सुसज्ज असलेले एक शासकीय वाहन सहभागी झाले होते.
नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखणे, तसेच कोणत्याही अनुचित परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने हा सराव करण्यात आला.
